देवळात शोधले तुला,
दगडात ही तु सापडला नाहीस,
माणसाने बनवले तुला,
पण तू माणसातही नाहीस,
तुझ्या गोष्टी सांगणारा मी,
आता सोडलेय तुझी आस ,
तुझ्या विना आता जगायचे आहे.
असा झालाय माझा ध्यास,
तुला जमले कधी तर,
नक्की भेट देऊन जा,
तुझी वाट अजून पाहतो मी,
फक्त तू आहेस हा विश्वास देऊन जा.